Wednesday , March 4 2026
Breaking News

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सजावटींच्या साहित्याने बेळगावसह उपनगरातील बाजारपेठा फुलल्या!

Spread the love

 

बेळगाव : लाडक्या गणरायाचे आगमन अवघ्या दोन दिवसांवर आले असून गणेश चतुर्थीच्या सणासाठी सजावटींच्या साहित्याने बेळगावसह उपनगरातील बाजारपेठा फुलल्या आहेत.

बाजारात सजावटींच्या साहित्यात विविध आकर्षक मखर प्लास्टिक फुलांच्या माळा, मोत्यांचे तसेच विविध प्रकारचे हार, पाट, फुलांच्या माळा, पडदे, झालर, आकर्षक तोरणे यांची बाजारपेठेत रेलचेल झाली आहे. त्याचप्रमाणे पूजेचे साहित्य अगरबत्ती, धूप तसेच इलेक्ट्रॉनिक समई यासह गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या साहित्याची बाजारपेठ फुलली आहे. लाडक्या बाप्पाची आरस करण्यासाठी नागरिक खरेदी करताना दिसून येत आहेत. दोन दिवसात पावसाने काहीशी विश्रांती घेतल्यामुळे गणेश भक्तांच्या उत्साहाला उधाण आली आहे. लाडक्या गणरायाच्या स्वागतात कोणतीही कसर राहू नये यासाठी भक्तांची धडपड दिसून येत आहे. बेळगावसह चंदगड, गोवा येथून देखील गणेश भक्त बेळगावात येत आहेत. पावसाने उघडीप दिल्यामुळे भक्तांमध्ये उत्साह संचारला आहे. बेळगाव शहर परिसरात गणपत गल्ली, खडे बाजार, समादेवी गल्ली, पांगुळ गल्ली, शनिवार खुट आदी ठिकाणी मखर विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. घरगुती गणेशोत्सव बरोबरच सार्वजनिक गणेशोत्सवाची तयारी देखील जोरात सुरू आहे. आगमन सोहळा जल्लोषात सुरू आहे. विविध प्रकारच्या सजावटीच्या साहित्याकडे ग्राहकांचा ओढा दिसून येत आहे. आकर्षक झुंबर तसेच रंगीबेरंगी फुलांच्या, विद्युत रोषणाच्या माळा, चक्र, लोटस, स्टार अशा विविध प्रकारच्या आकर्षक माळा विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. एलईडी समई, पणत्या मल्टी कलर, फोकस माळा, विद्युत रोषणाई हलक्या वजनांच्या माळाना यंदा अधिक मागणी आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मंडप उभारणी तसेच सजावटीचे काम जोरात सुरू आहे. एकंदरीत सजावटीच्या साहित्यामुळे संपूर्ण बाजारपेठेत झगमगाट दिसून येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *