

बेळगाव : तारांगण, प्रवीण हॉलिडे आणि सुनील भोसले यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगावच्या भजनी मंडळ यांना एक व्यासपीठ म्हणून नादब्रह्म भजन सोहळ्याचे आयोजन केले गेले हा कार्यक्रम नुकताच मिलेनीयम गार्डन येथे पार पडला.
कन्सल्टिंग इंजिनियर सुनील भोसले व सामाजिक कार्यकर्त्या रेणू भोसले, प्रवीण बेळगावकर, प्रकाश कालकुंद्रीकर तारांगणच्या संयोजका अरुणा गोजे पाटील, अर्चना पाटील, सुधा माणगावकर व्यासपीठावर होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. प्रथम क्रांती महिला भजनी मंडळ यांनी भजन सादर केले. जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव सखी ग्रुप भजनी मंडळांनी नृत्य व भजन सादर केले, सद्गुरू भजनी मंडळ, शारदा महिला भजनी मंडळ, अन्नपूर्णश्वरी दैवद्न्य महिला मंडळ, विश्वकर्मा महिला भजनी मंडळ, शहापूर, विश्वकर्मा महिला भजनी मंडळ, माऊली महिला भजनी मंडळ यांनी विविध भजन, गवळण, भारुड एकापेक्षा एक असे सादरीकरण केले. भजन मंडळानी रसिकांची मने जिंकली. सर्व भजनी मंडळांना सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. सर्व भजनी मंडळांनी कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल तारांगण व प्रायोजकांचे आभार मानले.


Belgaum Varta Belgaum Varta