Sunday , September 8 2024
Breaking News

बेळगावकर शिवप्रेमीनो.. भुईकोट किल्ला वाचूवया!!

Spread the love

बेळगाव : बेळगाव हे ऐतिहासिक शहर आहे. अनेक राजवटी बेळगावकरांनी पाहिल्या, छत्रपती शिवाजी महाराज तर बेळगावचा मानबिंदू वअस्मितेचे ठिकाण. छत्रपतींच्या नावाने अवघा बेळगावकर फुलून येतो. जय भवानी.. जय शिवाजी ही घोषणा बेळगावकरांसाठी मूलमंत्र आहे.

महाराष्ट्रात पसरलेले किल्ले ही शिवाजी महाराजांची रियासत. यांचं जतन करणं शिवप्रेमीचं कर्तव्य आहे. बेळगावचा किल्ला हाही त्यापैकी एक, पण बाजूनी वाढलेल्या झुडपाने बेळगावच्या किल्ल्याचा गळा आवळला जात आहे.
बेळगावची ओळख असणाऱ्या किल्ल्याला क्षती पोहोचण्याची वेळ आलेली आहे. काळाची पावलं ओळखून किल्ल्याची साफसफाई करणं गरजेच आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावातील सकल मराठा समाजाने येत्या रविवारी 27 मार्च रोजी सकाळी 8 ते 2 या वेळेत किल्ल्याची स्वच्छता करण्याचे ठरविले आहे.
तरी समस्त शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने आपापल्या घरातील साफसफाईची अवजारे घेऊन कारसेवेसाठी हजर रहावे असे आवाहन प्रदीप अष्टेकर, किरण जाधव, रमेश गोरल, परशराम मुरकुटे, सुनील जाधव, रमाकांत कोंडस्कर, गुणवंत पाटील, दत्ता जाधव, शिवाजी सुंठकर, बंडू केरवाडकर, सागर पाटील, रमेश रायजादे, संजय कडोलकर, श्रीनाथ पवार यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

ईद-ए-मिलाद २२ सप्टेंबर रोजी साजरा करणार; मुस्लिम बांधवांचा निर्णय

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव काळातच होणार असलेला ईद-ए-मिलाद हा सण पुढे ढकलण्याचा निर्णय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *