Tuesday , March 3 2026
Breaking News

हॉकी बेळगाव व शासनातर्फे 29 रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन

Spread the love

 

बेळगाव : हॉकी बेळगाव, जिल्हा युवजन क्रीडा खाते व गट शिक्षण खात्यातर्फे राष्ट्रीय क्रीडा दिन नेताजी सुभाषचंद्र बोस (लेले) मैदान येथे शुक्रवार दि. 29 ऑगस्ट रोजी 10 वाजता साजरा करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी अभिनव जैन, जिल्हा युवजन क्रीडा अधिकारी बी श्रीनिवास, गट शिक्षण खात्याच्या शारिरीक शिक्षण अधिकारी श्रीमती जे बी पटेल, हॉकी बेळगावचे अध्यक्ष गुळाप्पा होसमनी, सचिव सुधाकर चाळके आदी उपस्थित राहणार आहेत.
सायंकाळी 4 वाजता होणाऱ्या बक्षीस वितरण समारंभात भारत सरकारचे कर्नाटक गोवा विभागीय व्हिजीलन्स आयुक्त डॉ सागर देशपांडे उपस्थित राहणार आहेत.
हॉकी बेळगाव संस्थेला बेळगाव गट शारिरीक शिक्षण अधिकारी जे बी पटेल यांनी हॉकी स्पर्धा आयोजित करण्याचे पत्र दिले आहे. यावेळी अध्यक्ष गुळाप्पा होसमनी, सचिव सुधाकर चाळके, प्रकाश कालकुंद्रीकर, सविता वेसणे, सविता हेब्बार, प्रकाश बिळगोजी, सागर पाटील, एच व्ही रुगी, काकतीकर, प्रेमकुमार, चिदानंद असोदे, बापुल काळोजी आदी उपस्थित होते. तसेच जिल्हा युवजन अधिकारी बी श्रीनिवास यांचेशीही कार्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या आयोजनाची चर्चा करण्यात आली. यावेळी बेळगाव शहरातील प्राथमिक शाळेच्या हॉकी स्पर्धा दिवसभर शुक्रवार दि 29 रोजी लेले मैदान येथे घेण्यात येणार आहेत. यामध्ये विविध शाळा, माध्यमिक विद्यालय, व महाविद्यालयांनी मुला-मुलींनी सहभाग घेतला आहे. विजेत्या संघांना चषक व सर्टिफिकेट देण्यात येणार आहेत.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *