बेळगाव : सध्या मुंबई येथील आझाद मैदानावर मराठा समाजासाठी आरक्षण मिळवण्यासाठी आपण माननीय मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहात. आपले हे आंदोलन मराठा समाजाचे शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय प्रश्न उपस्थित करत आहे. या उपोषणामुळे महाराष्ट्रभर मराठा समाजाची मागणी अधिक तीव्रपणे चर्चेत आली आहे.
आम्ही बेळगाव येथील मराठा समाजाचे सदस्य, या महत्त्वाच्या आंदोलनाला पूर्णपणे समर्थन देत आहोत. मराठा समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक सशक्ततेसाठी मराठा समाजाला आरक्षण मिळणे अत्यंत आवश्यक आहे. या आंदोलनामुळे समाजातील सर्व घटकांना समान संधी मिळवण्यासाठी एक व्यापक दृष्टीकोन तयार होईल, जे सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे आहे.
यापत्राद्वारे आम्ही जाहीर करतो की, बेळगाव येथील मराठा समाजाचा जाहीर पाठिंबा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आहे. आम्ही राज्य सरकारला व केंद्रसरकारला विनंती करतो की, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर सकारात्मक विचार करून लवकरच ठोस निर्णय घेतला जावा. आम्ही यासाठी संघटितपणे आपल्या मागण्यांचा पाठपुराव्यासाठी जरांगे पाटील यांच्या पाठीशी राहू. आशा आहे की, सरकार या मुद्द्द्यावर योग्य व समर्पक निर्णय घेईल.
आम्ही सकल मराठा व मराठी क्रांती (मूक) मोर्चाच्या वतीने अपल्या उपोषणाला जाहीर पाठिंबा देत असल्याचे जाहीर मराठा क्रांती मोर्चाचे बेळगाव सहआयोजक प्रकाश मरगाळे, समन्वयक गुणवंत पाटील यांनी पत्राद्वारे केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta