बेळगाव : सार्वजनिक ठिकाणी अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला शहापूर पोलिसांनी अटक केली आहे.
शहापूर पोलीस ठाण्याने बुधवारी समर्थ नगर येथे केलेल्या कारवाईत विनायक रामा चारटकर नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली. त्याच्याकडून १५.९८ ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले असून, त्याची किंमत सुमारे ३० हजार रुपये आहे. पोलिसांनी आरोपीकडून हेरॉईनसह त्याची दुचाकी आणि मोबाईल जप्त केला असून, त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. या कामगिरीबद्दल शहर पोलीस आयुक्त आणि डीसीपींनी पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
Belgaum Varta Belgaum Varta