बेळगाव : बेळगावात हिंदू-मुस्लिम एकतेचा आदर्श दर्शवित माजी महापौर विजय मोरे यांच्या पुढाकारातून अनोळखी हिंदू वृद्धेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
बेळगावात माणुसकी आणि जातीय सलोख्याचा एक आदर्श प्रसंग समोर आला आहे. बेळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मागील १० ते १५ दिवसांपासून उपचार घेत असलेल्या एका अनोळखी हिंदू वृद्ध महिलेचे काल निधन झाले. ही माहिती मिळाल्यानंतर खद्री जीवळे यांनी तात्काळ माजी महापौर विजय मोरे यांना कळवले. विजय मोरे यांनी पुढाकार घेऊन त्या महिलेच्या पार्थिवावर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था केली. त्या वृद्ध महिलेचे कोणीही नातेवाईक हजर नसताना, सदशिवनगर स्मशानभूमीत पूर्ण हिंदू रितीरिवाजांनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्कारासाठी हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजाचे लोक एकत्र पुढे आले. या कृतीतून समाजात असलेल्या मजबूत बंधाचे दर्शन घडले.
यावेळी गंगाधर पाटील, गणेश रोकडे, निसार शमशेर, अँलन विजय मोरे, दीपक, संजू, ‘हर्ष अमन’ टीम, महापालिकेची सदशिवनगर स्मशानभूमी टीम आणि इतर अनेक जण उपस्थित होते. या घटनेचे सर्वत्र कौतुक होत असून, प्रेम, आदर आणि एकता कोणत्याही धार्मिक सीमेच्या पलीकडे असू शकते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta