Friday , March 6 2026
Breaking News

खेमाजीराव गोडसे शैक्षणिक ट्रस्टतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा सोमवारी

Spread the love

 

बेळगाव : खेमाजीराव गोडसे शैक्षणिक ट्रस्टतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा सोमवार दि. 8 रोजी आयोजित करण्यात आला आहे.
कॉलेज रोड येथील सह्याद्री पतसंस्थेच्या सभागृहात सायंकाळी 5.30 आयोजित या समारंभाला प्रमुख पाहुणे या नात्याने पायोनियर अर्बन बँकेचे संचालक शिवराज पाटील उपस्थित राहणार आहेत. यावेळी गोडसे कुटुंबियांकडून जवळपास एक लाख रूपयांची रोख रक्कम पात्र विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे.
या समारंभाला विद्यार्थी, पालक व समाज बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मुख्य ट्रस्टी चंद्रकांत गोडसे यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

दागिने लांबवणाऱ्या महिला टोळीचा पर्दाफाश

Spread the love  बेळगाव : बेळगाव येथील मराठा कॉलनीतील रहिवासी निर्मला मिलिंद सावंत यांनी ४ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *