Wednesday , March 4 2026
Breaking News

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव जिल्हा कार्यकारिणीची उद्या बैठक

Spread the love

राज्याध्यक्ष सीमाकवी रवी पाटील उपस्थित राहणार

बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव जिल्हा अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदची उद्या बुधवार दि. 23 मार्च रोजी पुरुष व महिला कार्यकारिणीची बैठक बोलविण्यात आली आहे.

पहिले राज्यस्तरिय बेळगाव मराठी साहित्य संमेलन २०२० रोजी मराठा मंदिर येथे भरविण्यात आले. त्यानंतर लॉकडऊन सुरु झाले. सन २०२१ ला ऑनलाईन संमेलन घेतले. सन् २०२२ यावर्षीचे तिसरे राज्यस्तरीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन आयोजनासंदर्भात नार्वेकर गल्ली येथील सुप्रसिद्ध डी. बी. पाटील फोटो स्टुडिओच्या कार्यालयात सायंकाळी ५.३० वाजत बैठक आयोजित करण्यात आली आहे .
अभामसा परिषदेचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण, उपाध्यक्ष डी. बी. पाटील, सचिव रणजीत चौगुले व महिला जिल्हाध्यक्षा अरुणा गोजे -पाटील तसेच संमेलनाचे कार्याध्यक्ष महादेव चौगुले व मार्गदर्शक शिवसंत संजय मोरे व एम. वाय. घाडी यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
या बैठकीला अभामसाप कर्नाटक राज्याध्यक्ष रवी पाटील उपस्थित राहणार आहेत.
बेळगाव ग्रामीण सीमाभागात मराठी साहित्य संमेलन भरवत आहेत.
मराठा मंदिर येथे भरविले जात असलेले बेळगावकरांना वाटते की, मराठी माणसांचे मानबिंदू असलेले अभामसा परिषदेचे बेळगाव मराठी साहित्य संमेलन कधी भरविणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *