Tuesday , March 3 2026
Breaking News

गॅंगवाडीमध्ये 1.10 लाख रुपये किमतीचा दारू साठा जप्त

Spread the love

 

बेळगाव : माळमारुती पोलिसांनी काल शहरातील गँगवाडी येथे बेकायदा दारू विक्री करणाऱ्या अड्ड्यावर धाड टाकून तब्बल 1 लाख 10 हजार रुपये किमतीचा बेकायदेशीर दारू साठा जप्त केला. पोलिसांची धाड पडताच एका महिलेसह तिघा आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.

पोलिसांच्या हातावर तुरी देणाऱ्या आरोपींमध्ये बाळू दत्ता सकट, ओंकार बाळू सकट आणि एका महिलेचा समावेश आहे. श्री गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा दंडाधिऱ्यांनी दारू विक्री बंदीचा आदेश बजावला असताना काल शनिवारी गॅंगवाडी येथे कांहीजण सार्वजनिक ठिकाणी दारूची विक्री करत होते. याबाबतची माहिती मिळताच माळ मारुती पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक व्ही. एम. मोहिते आणि त्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ताबडतोब घटनास्थळी धाड टाकली. त्यावेळी उपरोक्त तिघा आरोपींनी पोलिसांच्या हातातून निसटून पळ काढण्यात यश मिळवले. तथापि पोलिसांनी घटनास्थळी आढळून आलेला 1 लाख 10 हजार रुपये किमतीचा बेकायदेशीर दारू साठा जप्त केला. या दारू साठ्यामध्ये विविध कंपन्यांचे व्हिस्की, रम यांच्या टेट्रापॅक मधील दारूचे बॉक्स, तसेच विविध कंपन्यांच्या बियर बाटल्यांच्या बॉक्सचा समावेश आहे. याप्रकरणी माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलीस फरारी आरोपींचा शोध घेत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *