बेळगाव : मच्छे येथील श्री बाल शिवाजी सार्वजनिक वाचनालयाला महाराष्ट्र शासनाकडून पाच लाखाची मदत मिळालेली आहे.
मदत निधी मिळवून देण्यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माननीय श्री. रोहन बने सर तसेच शिवभक्त श्रीधन बाळेकुंद्री व वाचनालयाचे माजी अध्यक्ष व मच्छेतील सामाजिक कार्यकर्ते संतोष जैनोजी यांनी प्रयत्न केले.
आपली मराठी भाषा ही शिक्षण व प्रगतीच्या सर्व क्षेत्रांना गवसणी घालणारी ज्ञानाची भाषा आहे. ती शारदेच्या मंदिरातील प्रकाशमय दीप आहे. व याच माय मराठीच्या संवर्धनासाठी व मराठमोळी वाचन संस्कृती जतन करण्यासाठी महाराष्ट्र शासन सीमावर्ती भागामध्ये मराठी भाषा अभिवृद्धी व भाषा संवर्धन करणाऱ्या संस्थांना आर्थिक मदत करत आहे.
मदत निधी माननीय श्री उदय सामंत सर (उद्योग मंत्री, मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र राज्य), यांनी मंजूर करून दिलेला आहे.
श्री बाल शिवाजी सार्वजनिक वाचनालय भाषा संवर्धनासाठी व विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी तसेच वाचन चळवळ वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवत असते. शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, विविध विषयांवरील चर्चासत्रे, तसेच राष्ट्रपुरुषांचे, समाजसुधारकांचे विचार समाजापर्यंत पोहोचवणे, मराठी भाषा कला साहित्य संस्कृती वृद्धिंगत करणे असे वाचनालयतर्फे विविध उपक्रम राबवले जातात.
यावेळी वाचनालयाच्या सर्व कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र शासनाचे आभार मानले.
आभार व्यक्त करण्याच्या कार्यक्रमाप्रसंगी वासुदेव लाड, संतोष जैनोजी, बजरंग धामणेकर, गजानन छप्रे, वाचनालयाचे अध्यक्ष संभाजी कणबरकर, उपाध्यक्ष सूर्यकांत मरूचे, खजिनदार सुशील धामणेकर व कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta