Saturday , December 13 2025
Breaking News

मोटरसायकल अपघातात मणतुर्गा येथील युवक गंभीर जखमी

Spread the love


बेळगाव : भरधाव मोटरसायकल रस्त्यावरील दुभाजकाला धडकल्यामुळे घडलेल्या अपघातात एक युवक गंभीर तर दुसरा किरकोळ जखमी झाल्याची घटना आज दुपारी खानापूर तालुका सरकारी हॉस्पिटल समोर घडली.
अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नांव गजानन कल्लाप्पा देवकरी (वय 22, रा. मणतुर्गा, खानापूर) असे आहे. गजानन आणि त्याचा मित्र आज मंगळवारी दुपारी 2:35 वाजण्याच्या सुमारास मोटरसायकलवरून खानापूरकडून नंदीगडकडे निघाले असता.
नियंत्रण सुटून भरधाव मोटरसायकल रस्त्यावरील दुभाजकाला धडकली. मोटर सायकलची धडक इतकी जबरदस्त होती की फेकला गेलेला गजानन पथदीपाला आदळून खाली कोसळला. यामध्ये डोक्याला गंभीर मार बसल्यामुळे त्याच्या नाका तोंडातून रक्तस्राव होत होता. त्याचप्रमाणे उजव्या पायाला देखील गंभीर इजा झाली. गजानन सोबत असलेल्या दुसऱ्या मुलाला मात्र किरकोळ दुखापत वगळता कांही झाले नाही.
सदर अपघात घडल्यानंतर जवळच सरकारी हॉस्पिटल असून देखील कोणीही अपघातातील जखमींनाच्या मदतीला धावून गेले नाही. तेंव्हा त्या ठिकाणी उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर आणि त्यांचे सहकारी अवधूत तुडवेकर यांनी पुढाकार घेऊन अन्य कांही लोकांच्या मदतीने जखमींना प्रथम खानापूर तालुका सरकारी हॉस्पिटलमध्ये हलविले.
तसेच त्यानंतर दरेकर आणि तुडवेकर यांनी स्वतः जातीने गंभीर जखमी झालेल्या गजानन देवकरी याला अधिक उपचारासाठी रुग्णवाहिकेतून बेळगावच्या बीम्स हॉस्पिटलमध्ये नेऊन दाखल केले.

About Belgaum Varta

Check Also

दिवंगत शांताबाई नंदिहळ्ळी यांना शोकसभेत श्रद्धांजली

Spread the love  येळ्ळूर : येळ्ळूर येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या सभागृहात दिवंगत शांताबाई (आक्का) परशुराम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *