Friday , October 18 2024
Breaking News

शहापूर भागात रंगोत्सव जल्लोषात

Spread the love


बेळगाव : गेल्या दोन वर्षांपूर्वी सुरु झालेला कोरोनाचा कहर आणि यानंतर सर्व सण आणि उत्सवांवर आलेले निर्बंध…. यानंतर हळूहळू परिस्थिती आता पूर्वपदावर येत आहे. याच अनुषंगाने यंदा सर्व सण उत्सव पुन्हा पूर्ववत उत्साहात साजरे होत आहेत. या पार्श्वभूमीवर बेळगाव तालुका आणि शहापूर भागात आज मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी करण्यात आली.
शहापूर, वडगाव खासबाग आदी भागात आज रंगपंचमी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. बेळगाव आणि परिसरात अनेक ठिकाणी होळी पौर्णिमेच्या दुसरेदिवशी धुलीवंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. मात्र तालुका आणि बेळगावमधील शहापूर, वडगाव आणि खासबागसह काही ठिकाणी होळी पौर्णिमेच्या दुसरे दिवशी रंगपंचमीचा सण साजरा केला जातो. कोरोना परिस्थितीमुळे गेल्या दोन वर्षात होळी साजरी न झाल्याने यंदा तरुणाईने मोठ्या जल्लोषात होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमी साजरी केली. डीजे, डॉल्बीच्या दणदणाटासह काही ठिकाणी इस्कॉनच्या पारंपरिक गाण्यांवरही
रंगपंचमीच्या या उत्सवात केवळ तरुण आणि पुरुषच नाही तर आबालवृद्धांसह महिलाही मोठ्या उत्साहात सहभागी झाल्या होत्या. विविध वेषभूषेसह रंगीबेरंगी रंगांची उधळण करत डीजे आणि डॉल्बीच्या गाण्यावर प्रत्येकाने ताल धरलेला पाहायला मिळाला.
गेल्या दोन वर्षात कोविड संसर्ग फोफावण्याची शक्यता होती. यामुळे रंगपंचमीसह अनेक सणांवर निर्बंध लादण्यात आले होते. यंदाची रंगपंचमी मात्र प्रत्येकाने मोठ्या जल्लोषात साजरी केली,
सध्याचे युग हे धावपळीचे आहे. या धावपळीच्या जीवनात परंपरेला फाटा देत इन्स्टंट गोष्टींचा अवलंब प्रत्येकजण करत आहे. मात्र आपले सण आणि परंपरा आपण जपावी यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठांकडून व्यक्त होतानाही पाहायला मिळाले. आपल्याला मिळालेली परंपरा आणि त्या परंपरेचा वारसा प्रत्येकाने जपण्याची आवश्यकता असल्याचे मत देखील यावेळी व्यक्त झाले.
शहापूर, वडगाव, खासबाग सह तालुक्यातील अनेक भागात मोठ्या उत्साहात आज रंगपंचमीचा सण साजरा करण्यात आला. दोन वर्षांनंतर मिळालेल्या या संधीमुळे अबालवृद्धांसह सारेचजण उत्साहात दिसून आले.

About Belgaum Varta

Check Also

वैश्यवाणी समाजातर्फे कोजागिरी पौर्णिमा साजरी

Spread the love  बेळगाव : श्री समादेवी संस्थान, वैशवाणी समाजातर्फे बुधवारी रामनाथ मंगल कार्यालयात कोजागिरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *