बेळगाव : बुधवारी बेळगावातील किल्ला तलावात एका ऑटो चालकाने उडी मारून जीवन संपवले. मृत व्यक्तीची ओळख बेळगावच्या कंग्राळी येथील किरण मनगुतकर (५४) अशी झाली आहे.किरण मनगुतकर यांनी एक वर्षापूर्वी मुलीचे लग्न केले होते. ते अत्यंत प्रामाणिक होते आणि सर्वांशी त्यांचे संबंध चांगले होते. त्यांच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण हे आत्महत्या करतील असे वाटले नव्हते. त्यांनी अचानक उचललेल्या या पावलामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
एका ऑटो चालकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “किरण यांनी मुलीचे लग्न केले होते आणि गेल्या महिन्यातच तिला बाळ झाले आहे. गेल्या २०-३० वर्षांपासून ते ऑटो चालवत होते. एकदा ते म्हणाले होते की, त्यांना कर्ज झाले आहे.”बाजारपेठ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, जलतरणपटूंच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला आहे. यावेळी कुटुंबियांचा आक्रोश पाहून उपस्थितांनाही दुःख झाले. किरण यांच्या पश्चात दोन मुली आणि एक मुलगा आहे.
Belgaum Varta Belgaum Varta