Wednesday , March 4 2026
Breaking News

बेळगावात अवकाळीची जोरदार हजेरी; लेले ग्राउंडजवळ झाड कोसळले

Spread the love


बेळगाव : वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार अवकाळी पावसाने मंगळवारी दुपारी बेळगावला झोडपले. त्यामुळे काही ठिकाणी जुनाट झाडे कोसळल्याच्या घटनाही घडल्या.
मंगळवारी दुपारी बेळगाव शहरात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसाने शहरवासीयांना उकाड्यापासून थोडा दिलासा मिळाला. मात्र पावसामुळे काही ठिकाणी जुनी झाडे कोसळली. टिळकवाडीतील लेले ग्राउंडजवळ एक मोठ्या आकाराचे झाड या पावसामुळे कोसळले. रस्त्याच्या मधोमध हे झाड कोसळल्याने रस्त्याच्या दोन्हीकडेची वाहतूक ठप्प झाली. त्याशिवाय या परिसरातील वीज पुरवठाही खंडित झाला. सुदैवाने यावेळी रस्त्यावर कोणी नसल्याने प्राणहानी टळली अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *