येळ्ळूर : ‘महाराष्ट्र एकीकरण समिती येळ्ळर’च्यावतीने सीमासत्याग्रही कै. सुभाष यल्लोजी कदम, पैलवान कै. गोविंद वासुदेव कुगजी, हाडाचे वैद्य कै. परशराम ओमाण्णा धामणेकर, निवृत्त शिक्षक कै. चांगदेव भरमाजी उडकेकर, मारुती नागोजी उघाडे, कै. लक्ष्मीबाई गुंडू गोरल, कै. राजाराम सुबराव पाटील, कै. अनंत यल्लापा पाटील, भारतीय सैनिक कै. राहुल आनंदा गोरल या समितीच्या कार्यकर्त्यांना दोन मिनिटे मौन पाळून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. शोकसभेच्या अध्यक्षस्थानी वामनराव पाटील होते.
प्रारंभी प्रकाश अष्टेकर यांनी दिवंगत कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लढ्यातील योगदानाबद्दल सविस्तर माहिती विशद करून श्रद्धांजली वाहिली. माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष दुद्दापा बागेवाडी यांनी या दिवंगत कार्यकर्त्यांनी शेवटच्या घटकेपर्यंत समितीनिष्ठ राहून समितीच्या धेय- धोरणाना पाठिंबा दिल्याचे सांगितले. या शोकसभेत दत्ता उघाडे, राजू पावले, प्रकाश पाटील, सतिश देसूरकर, चांगदेव परीट, यल्लापा पाटील, राकेश परिट, भिमराव पुण्याणावर, मधु पाटील, नारायण बेकवाडकर, परशराम कणबरकर, सुरज गोरल, कृष्णा शहापूरकर, म्हात्रू लोहार आदि बहुसंख्य समिती कार्यकर्ते हजर होते.
Belgaum Varta Belgaum Varta