बेळगांव : नेहरू नगर येथील पीपल ट्री महाविद्यालयात टीचर्स डे आणि फ्रेशर्स डे असा संयुक्त कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
विद्यार्थी राज भवन मध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमात विविध कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध पदवी पूर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, शालेय मुख्याध्यापक, लेक्चरर्स तसेच इतर शिक्षकांचा पीपल ट्री महाविद्यालय तर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी पीपल ट्री कॉलेजचे डीन संतोष एम.जी, डिग्री प्रिन्सिपल अविनाश अख्खी, पदवी पूर्व महाविद्यालयाचे प्राचार्य उमेश बेळगुंदी आदि मान्यवरांच्या हस्ते वरील सर्व शिक्षकांना शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.
Belgaum Varta Belgaum Varta