अथणी : अथणी तालुक्यातील तेलसंग गावात विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे गिरीश सक्री यांच्या मालकीच्या बिग बाजार दुकान पूर्णपणे जळून खाक झाले. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सदर दुर्घटना झाली असून सुमारे २० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे साहित्य जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दुकानात आग लागताच स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना ते शक्य झाले नाही. माहिती मिळताच अथणीहून अग्निशमन दल पोहोचले तोपर्यंत दुकान पूर्णपणे जळून खाक झाले होते. या घटनेत शेजारच्या काही घरांचेही किरकोळ नुकसान झाले.
या अनपेक्षित घटनेने गिरीश सक्रीच्या कुटुंबाला जबर धक्का बसला असून एक दिवस आधीच आईचे निधन झाले होते. गरिबीतून आलेल्या गिरीशने स्वयंपाकाचे काम करून आणि कर्ज काढून पैसे कमवून हे दुकान सुरू केले होते. या दुर्घटनेनंतर, गिरीशच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या डोळ्यांसमोर दुकान जळून खाक झालेले पाहून अश्रू अनावर केले.
Belgaum Varta Belgaum Varta