Monday , September 21 2026
Breaking News

रोटरी दर्पणच्यावतीने पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांना झंकार कार्यक्रमाचे निमंत्रण

Spread the love

 

बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण आणि रोटरी क्लब ऑफ बेलगाव नॉर्थतर्फे वतीने आयोजित करण्यात आलेल्या झंकार सीजन २ कार्यक्रमाला बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

रोटरी क्लब ऑफ बेलगाव दर्पणच्या अध्यक्षा रोटेरियन ऍड. विजयलक्ष्मी मन्निकेरी आणि रोटरी क्लब ऑफ बेळगाव नॉर्थचे अध्यक्ष रोटेरियन विकास गडवी यांनी क्लबच्या वतीने पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेऊन त्यांना कार्यक्रमासाठी आमंत्रित केले.

हा कार्यक्रम बुधवार, २४ सप्टेंबर २०२५ रोजी, मिलेनियम गार्डन, बेळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. झंकार सीझन 2 चा उद्देश युवकांची कला प्रतिभा पुढे आणणे, सांस्कृतिक अभिव्यक्तीस प्रोत्साहन देणे व मैत्री व सर्जनशीलतेसाठी एक प्रभावी व्यासपीठ निर्माण करणे हा आहे. या कार्यक्रमात युवा कलाकारांच्या कला व संस्कृती प्रतिभेला चालना मिळणार आहे. सतीश जारकीहोळी यांनीही आमंत्रणाचा स्वीकार करून कार्यक्रमाला उपस्थित राहू असे आश्वासन दिले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *