बेलगाव : आर.पी.डी. कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स (स्वायत्त), बेलगाव येथील प्लेसमेंट सेल आणि अलुम्नी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने, प्लेसमेंट सेलच्या शैक्षणिक वर्षातील उपक्रमांच्या उद्घाटन प्रसंगी शनिवारी “Soft Skills that Matter: Beyond Marks and Degrees” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेचे मुख्य पाहुणे व की-नोट स्पीकर म्हणून ऍड. कृष्णाकुमार जोशी, अभिमानास्पद आरपीडियन अलुम्नस व सध्या कर्नाटक उच्च न्यायालयात वकिली करणारे तरुण वकील सहभागी झाले होते. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी संवादकौशल्य, नेतृत्वगुण आणि जुळवून घेण्याची क्षमता या सॉफ्ट स्किल्स यशस्वी करिअर घडविण्यात किती महत्त्वाच्या आहेत हे अधोरेखित केले. शैक्षणिक गुणवत्ता नक्कीच महत्त्वाची असली तरी आजच्या स्पर्धात्मक वातावरणात प्रभावी संवाद, समस्यांचे निराकरण आणि नेटवर्किंग कौशल्ये हीच खरी व्यक्तीला वेगळी ओळख निर्माण करून देतात असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रिन्सिपॉल डॉ. अभय एम. पाटील यांनी भूषविले.
प्रा. पूजा डी. पाटील, प्लेसमेंट सेल ऑफिसर यांनी स्वागतपर भाषण करून अशा कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी दिशादर्शक ठरतात असे प्रतिपादन केले डॉ. प्रसन्ना बी. जोशी, Coordinator – IQAC व Alumni Association यांनी उपस्थितीने कार्यक्रमास गौरव प्रदान केला.
हेमा अनगोळकर यांनी तांत्रिक सहाय्य केले.
केसक सुतार, श्रुती बी. व पूजा मडीवाळ यांनी कार्यक्रमाचे (MOC) यशस्वी सूत्रसंचालन केले. Student Council सदस्य तसेच BA, B.Com, BBA चे विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले व रोजगारक्षमता व रोजगार क्षेत्रातील आव्हानांवर चर्चा केली.
Belgaum Varta Belgaum Varta