बेळगाव : मराठा समाज सेवा मंडळ, वडगाव बेळगाव संचलित नवनिर्माण मल्टीपर्पज सौहार्द सहकारी नि., वडगाव बेळगाव या पतसंस्थेची 13 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर 2025 रोजी संस्थेच्या सभागृहात चेअरमन प्राचार्य एस. ए. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
सर्व संचालकांनी दीप प्रज्वलन केले. सोसायटीचे माजी चेअरमन निवृत्त कॅप्टन श्री. डी. बी. पाटील यांनी शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. विद्यमान चेअरमन व माजी चेअरमन, सर्व संचालक, सल्लागार मंडळातील सदस्य व उपस्थित भागधारकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सोसायटीचे संस्थापक संचालक कै. डॉ. एम. आर. पाटील व कै. देवाप्पा केदारी पाटील यांना सर्व उपस्थितांनी दोन मिनिटे स्तब्धता पाळून श्रद्धांजली अर्पण केली.
प्रास्ताविकास चेअरमनने सोसायटीच्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला व अहवालाच्या निवेदनाचे वाचन करून 11 टक्के लाभांश जाहीर केला. व्यवस्थापक सौ. माया प्रशांत नाईक यांनी ताळेबंद पत्रक, नफा तोटा पत्रक व पुढील वर्षाच्या अंदाजपत्रकाचे वाचन करून सभागृहाची मंजुरी घेतली. जेष्ठ संचालक श्रीमान रावजी महादेव पाटील व सल्लागार श्रीमान आर. वाय. पाटील यांनी पतसंस्थेच्या कार्याचा आढावा घेऊन प्रशंसा केली. अध्यक्षीय भाषणात चेअरमनने सर्व संचालक, सल्लागार व नवोदित सल्लागार स्टाफच्या कार्याबद्दल व सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले.
सौ. प्रतीक्षा उदय सावंत व उद्योगपती श्रीमान जयकुमार देवाप्पा पाटील यांना पतसंस्थेच्या सल्लागार मंडळात सामावून घेतल्याचे जाहीर केले. सर्वसाधारण सभेला व्हा. चेअरमन उद्योगपती एन. एम. पाटील, संचालक श्री. डी. बी. पाटील रावजी पाटील, बाबू तळवार, सल्लागार सर्वश्री बंडू गणपती देसाई, आर. वाय. पाटील, सुनील पाटील, निंगोजी पाटील, कर्मचारी व बहुसंख सभासद हजर होते.
सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. आभार प्रदर्शन व्हा. चेअरमन उद्योगपती एन. एम. पाटील यांनी केले व सूत्रसंचालन श्रीमान एस. एच. पाटील यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta