उचगाव : श्री मळेकरणी सौहार्द सहकारी संघ नि उचगाव या सोसायटीच्या वतीने डॉ. संध्या देशपांडे यांना साहित्य भूषण पुरस्कार, ह. भ. प. प्रभाकर सांबरेकर यांना सेवा भूषण पुरस्कार, मेहबूब एम् मुल्तानी यांना सेवा भूषण पुरस्कार, श्रेया भोमाणा पोटे हिला क्रीडा भूषण पुरस्कार, बाळकृष्ण रामचंद्र देसाई यांना शिक्षक भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. स्वा. सै. परशुरामभाऊ नंदिहळ्ळी, जेष्ठ नागरिक निळकंठ नागाप्पा कुरबुर व त्यांची पत्नी यल्लव्वा कुरबुर या दाम्पत्याचा, निवृत्त मुख्याध्यापक श्री पी. आर. पाटील, जिल्हा आदर्श शिक्षक कुशकुमार देसाई, जिल्हा जेष्ठ नागरिक सचिव श्री. सुरेन्द्र देसाई, निवृत्त शिक्षक आर बी पाटील, साहित्यिक स्वरुपा इनामदार यांचा सत्कार करण्यात आला. तसेच एस एस एल सी उचगाव केंद्रातून प्रथम क्र. संजीवनी निं. सावंत 97.92%, द्वितीय क्र. भक्ती भै. चौगुले 97.28% , तृतीय क्र. अश्विनी म.पावशे 94.56% , उत्तेजनार्थ मनिषा बसवंत यळ्ळूरकर 92.96% त्याच बरोबर श्रीजीत पावशे, साईशा देसाई, रशिका पावशे, रक्षिता पावशे, मुक्ता शिंदोळकर, राधिका देसाई, तिर्था देसाई, श्रेयस देसाई, समिक्षा देसाई, कार्तिका देसाई यांचाही विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या सभासदांच्या मुलांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार समारंभ शंकर-पार्वती मंगल कार्यालय उचगाव येथे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे संस्थापक- चेअरमन श्रीमान जवाहरराव शंकरराव देसाई होते. प्रास्ताविक व स्वागत श्री. प्रकाश चलवेटकर यांनी केले. श्री मळेकरणी देवीच्या फोटोचे पूजन संचालक श्री सुरेश राजूकर यांनी केले. दीपप्रज्वलन डॉ. संध्या देशपांडे, संचालक श्री. मारुती सावंत, चंद्रकांत देसाई, लुम्माण्णा पावशे, कविता जाधव, प्रविणा देसाई, सुरेश बेनके यांनी केले. कार्यक्रमाला सोसायटीचे सभासद, ठेवीदार, हितचिंतक व कर्मचारी उपस्थित होते. सुत्रसंचालन श्री. प्रदीप झाजरी यांनी केले व आभार सेक्रेटरी श्री. के. एन. कदम यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta