
बेळगाव : प्रगतिशील लेखक संघ बेळगांव आणि साम्यवादी परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने शहिद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या शहीद हुतात्मा दिनी अभिवादन करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला आहे. सदर कार्यक्रम बुधवार दिनांक 23 मार्च 2022 रोजी सायंकाळी 5:30 वाजता रामदेव गल्ली बेळगांव येथील शहिद भगतसिंग सभागृहात होणार आहे.
कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी कॉ. माजी महापौर ॲड. नागेश सातेरी उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व बेळगावकरांनी व रसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक काॅ. प्रा. आनंद मेणसे आणि ज्येष्ठ पत्रकार काॅ. कृष्णा शहापूरकर यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta