Tuesday , March 3 2026
Breaking News

बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांची गर्दी

Spread the love

 

बेळगाव : काही त्रुटींमुळे बेळगावच्या खासगी ‘जय किसान भाजी मार्केट’ची परवानगी कृषी संचालकांनी रद्द केल्याने, आजपासून ‘जय किसान भाजी मार्केट’ने आपला व्यवसाय थांबवला. त्यामुळे पहाटेपासूनच मोठ्या संख्येने शेतकरी आपली उत्पादने बेळगावच्या सरकारी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घेऊन आले. शेतकरी नेते चुनप्पा पुजारी यांनी सरकारी एपीएमसीमध्ये भाजीपाला उत्पादने घेऊन आलेल्या शेतकऱ्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी येथे सरकारी अधिकारी आहेत. शेतकरी दररोज आपली उत्पादने येथे आणू शकतात. सर्वांनी मिळून एपीएमसी बाजाराला मोठे केले पाहिजे. शेतकऱ्यांनी आपली उत्पादने सातत्याने एपीएमसीमध्ये आणावीत, असे आवाहन त्यांनी केले.खासगी ‘जय किसान’ मार्केट आजपासून बंद झाल्याने, व्यापारी आणि शेतकऱ्यांनी पहिल्याच दिवशी शांततेत व्यवसाय केला. सुमारे ७५-८०% शेतकऱ्यांनी यात सहभाग घेतला. एपीएमसीमधील व्यापाऱ्यांनीही शेतकऱ्यांच्या उत्पादनांना चांगला भाव दिला. एपीएमसीने शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी पाणी, शौचालय, पार्किंग, विश्रांतीसाठी शेतकरी भवन आणि मोठे बाजार आवार उपलब्ध करून दिले आहे. भाजीपाला बाजारासाठी विविध विभागांमध्ये १५० दुकाने देण्यात आली आहेत, ज्यात १००% दुकाने वाटप झाली असून ५०% दुकाने व्यापाऱ्यांना वाटप करण्यास एपीएमसी तयार आहे, असे एपीएमसीचे सचिव विश्वनाथ रेड्डी यांनी म्हटले आहे.

एपीएमसी हा एक हाय-टेक बाजार असून, सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांना चांगला भाव मिळत आहे. तसेच, आलेल्या भाजीपाल्यापैकी ९०% भाजीपाला विकला गेला आहे. कर्नाटकसाठी हा एक आदर्श बाजार बनवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *