बेळगाव : डीसीसी बँकेच्या निवडणुक म्हणजे जणू युद्धाचे रणांगण झाले असल्याचे चित्र हुक्केरी तालुक्यात पहायला मिळत आहे. रमेश कत्ती यांचे समर्थक चक्क हातात शस्त्रे घेऊन फिरत आहेत.
हुक्केरीमध्ये डीसीसी बँकेच्या निवडणुकीचा व्याप दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, रमेश कट्टीचे समर्थक धारदार शस्त्रे घेऊन मतदारांना धमकी देत फिरत असल्याचे व्हिडीओमधून दिसत आहेत. यामुळे सामान्य नागरिकांतून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हुक्केरी तालुक्यातील बेल्लद येथील बागेवाडी गावात ही घटना घडली.
Belgaum Varta Belgaum Varta