बेळगाव : नियती को-ऑप. सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. १७ सप्टेंबर २०२५ रोजी न्यू उदय भवन, खानापूर रोड येथे मोठ्या उत्साहात पार पडली.
सभेची सुरुवात सर्व संचालक आणि मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाली. श्री. भूषण रेवणकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
सोसायटीच्या संस्थापिका, अध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांनी सोसायटीच्या प्रगती, यशस्वी कार्यप्रवृत्ती आणि भावी दृष्टीकोन याबाबत सविस्तर माहिती दिली.
ताळेबंद श्री. नरसिंह जोशी यांनी सादर केला, तर नफा-तोटा पत्रक सौ. अनुषा जोशी यांनी मांडले. अंदाजपत्रक सौ. दीपा प्रभुदेसाई यांनी मांडले. २०२५–२०२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प श्री. प्रसाद घाडी यांनी मांडला.
सर्व साधारण सभेला डॉ. समीर सरनोबत, श्री. भारत राठोड, श्री. रोहित देशपांडे, श्री. नरसिंह जोशी, श्री. प्रसाद घाडी, श्री. गजानन रामणकट्टी, श्री. अनुप जवळकर, श्री. बसवराज हप्पळी, श्री. बसवराज होंडणकट्टी, श्री. मिलिंद पाटील, श्री. संदीप खन्नूकर, श्री. विजय मोरे, श्री. अशोक नाईक, सौ. अनुषा जोशी, सौ. संध्या बिर्जे, सौ. सौंदर्या पुजारी, सौ. मेघा कदरोळी, श्री. दामोदर काळे, सौ. मृण्मयी देसाई आदी मान्यवर, सल्लागार, कर्मचारी व भागधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. किशोर काकडे यांनी केले. शेवटी श्री. रोहित देशपांडे यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta