Wednesday , March 4 2026
Breaking News

बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत दुसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांची गर्दी

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव येथील ‘जय किसान’ या खासगी बाजाराने आपले व्यवहार थांबवल्यामुळे, येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही शेतकरी मोठ्या संख्येने आपला शेतमाल घेऊन आल्याचे दिसून आले. त्यामुळे बाजारपेठेत शेतकऱ्यांची गर्दी वाढली होती.
बेळगावमधील ‘जय किसान’ या खासगी बाजाराचा परवाना रद्द झाल्याने शेतकरी आपला शेतमाल बुधवारपासून बेळगाव एपीएमसीमध्ये आणत आहेत. आज, गुरुवारीदेखील विविध भागांतून शेतकरी मोठ्या संख्येने आपला माल घेऊन एपीएमसीमध्ये आले होते. यावेळी व्यापाऱ्यांनीही चांगला प्रतिसाद दिला, असे दृश्य बाजारपेठेत दिसत होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *