बेळगाव : आगामी दसरा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खडेबाजार पोलिस स्थानकात दसरा व दुर्गामाता उत्सव मंडळ पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक आज पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी खडेबाजार उपविभागाचे एसएससी शेखरप्पा हे होते.
या बैठकीत कॅम्प, चव्हाट गल्ली, गोंधळी गल्ली कांगली गल्ली आदी भागात होणाऱ्या श्री दुर्गामाता उत्सवासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना शेखरप्पा म्हणाले की, सालाबाद प्रमाणे दुर्गामाता आगमन व विसर्जन सोहळा वेळेत व शांततेत पार पाडून प्रशासनाला सहकार्य करावे. ज्या पद्धतीने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला त्याच पद्धतीने दसरा सण शांततेत साजरा करावा. उत्सवा दरम्यान काही समस्या उद्भवल्यास तात्काळ नजीकच्या पोलिस स्थानकाशी संपर्क साधावा. शांतता आणि जातीय सलोखा राखून दसरा महोत्सव उत्साहात साजरा करावा, असे आवाहन एसीपी शेखरप्पा यांनी केले. बैठकीला चव्हाट गल्ली, कॅम्प, कांगली गल्ली, गोंधळी गल्ली येथील श्रीदुर्गा माता उत्सव मंडळाचे पदाधिकारी सदस्य व पोलीस अधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta