Tuesday , March 3 2026
Breaking News

मच्छे येथील व्ही. एस. पाटील हायस्कूलच्या कबड्डी व थ्रोबॉल संघांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

Spread the love

 

मच्छे : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित मच्छे येथील व्ही. एस. पाटील हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी तालुका पातळीवर झालेल्या मुलांच्या कबड्डी व थ्रोबॉल स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे.
निर्मळ नगर येथे झालेल्या तालुका पातळीवरील क्रीडा स्पर्धेत अंतिम सामन्यात मन्नीकेरी हायस्कूलचा पराभव करत मुलांच्या थ्रोबॉल संघाने तसेच कबड्डी खेळातील अंतिम सामन्यात सरस्वती हायस्कूल हंदिगनूर विरूद्ध मच्छे शाळेच्या कबड्डी संघाने प्रथम क्रमांक मिळविले. या दोन्ही संघांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
तसेच वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये वेदांत पाटील याने 62 किलो कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक एस. डी. पाटील, क्रीडा शिक्षक पी. के. चव्हाण, संघ व्यवस्थापक अजित नाकाडी व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *