दुसऱ्या शैक्षणिक सत्रामध्ये शनिवारी पूर्ण दिवस शाळा
बेळगाव : उद्या शनिवार दि. २० सप्टेंबरपासून शाळांना दसरा सुट्टी सुरू होत आहे. यंदा दसरा सुट्टी २० सप्टेंबर ते ६ ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे. ७ ऑक्टोबरपासून शाळा पुन्हा सुरू होणार असून दुसऱ्या सत्राला प्रारंभ होईल, असे शालेय शिक्षण खात्याच्या उपसंचालकांनी (प्रशासन) कळविले आहे.
दसरा सुट्टीनंतर सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्रामध्ये शनिवारी पूर्ण दिवस शाळा घेण्यात याव्यात, असा आदेश शालेय शिक्षण खात्याच्या उपसंचालकांनी दिला आहे. मागील महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने शाळांना सुट्टी देण्यात आली होती. सुट्टीचे दिवस भरून काढण्यासाठी शनिवारी पूर्ण दिवस शाळा भरवावी, असे खात्याने म्हटले होते.
Belgaum Varta Belgaum Varta