
बेळगाव : बेळगाव शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेल्या दोन दुचाकी जप्त करत दोघा दुचाकी चोरांना हिरेबागेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. एकूण 4 लाख 10 हजार रुपये किमतीच्या सात दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. बेळगाव शहरात वाढते चोरीचे प्रकार लक्षात घेत बी. एम. गंगाधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याचे पीएसआय एस. के. होळेन्नवर आणि त्यांच्या सहकार्याने तपास सुरू केला होता. तपासा दरम्यान संतोष, शिवप्पा उर्फ शिवानंद बेविनकोप्प (वय 30 रा. इंचल, ता. सौंदत्ती) व राजू निंगाप्पा पाटील (वय 32 खानापूर, सध्या राहणार कॅम्प) या दोघांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले होते. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी दुचाकी चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून एकूण सात दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

यापैकी हिरेबागेवाडी पोलीस स्थानक हद्दीत तर इतर दुचाकी शहापूर, माळमारुती, जुने हुबळी तसेच सौंदत्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेल्या होत्या. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याचे पीआय एस. के. होळेन्नवर, पीएसआय अविनाश येरगोंडा, पीएसआय बी.के. मिटगार, एएसआय आर. आय. सनदी, एम. आय. तुरमरी, अक्षयकुमार नाईक, प्रभाकर भुषी, आर एस केळगीनिमणी यांच्या पथकाचे बेळगाव शहर पोलीस आयुक्तांनी कौतुक केले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta