Wednesday , March 4 2026
Breaking News

जाती सर्वेक्षणात “धर्म : हिंदू, जात : वीरशैव लिंगायत”च नमूद करा : महांतेश कवटगीमठ

Spread the love

 

बेळगाव : कर्नाटक राज्यात सुरू असलेल्या जाती सर्वेक्षणात समस्त वीरशैव लिंगायत समाजाने ‘धर्म’ या रकान्यात हिंदू आणि ‘जात’ या रकान्यात वीरशैव लिंगायत असेच नमूद करावे, असे आवाहन भाजपचे माजी आमदार महांतेश कवटगीमठ यांनी केले आहे.
बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी यासंदर्भात माहिती दिली. ‘वीरशैव-लिंगायत समाज हा राज्यातील एक मोठा समाज आहे आणि वीरशैव-लिंगायत हे दोन्ही शब्द समानार्थी आहेत. हा समाज सनातन हिंदू धर्माचाच एक भाग आहे,’ असे ते म्हणाले. जाती सर्वेक्षणात ‘धर्म हिंदू, जात वीरशैव लिंगायत’ आणि त्यानंतर उपजात नमूद करावी, असा निर्णय दावणगेरे आणि हुबळी येथील परिषदांमधील कायदेतज्ज्ञांच्या सल्ल्याने घेण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी, भाजपचे प्रवक्ते ऍडव्होकेट एम. बी. जिरली यांनीही जाती सर्वेक्षणावर आक्षेप घेतला. ते म्हणाले, ‘सरकारने जाती सर्वेक्षणातील आक्षेपार्ह रकाने वगळावेत, अन्यथा आंदोलन केले जाईल. मागासवर्गीय आयोगाच्या कायद्यानुसार, दर दहा वर्षांनी शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक सर्वेक्षण करून सरकारला अहवाल सादर करणे अपेक्षित आहे. सरकारने कांतराराजू आयोगाचा अहवाल स्वीकारण्यापूर्वी तो जनतेच्या निदर्शनास आणून द्यावा. जाती सर्वेक्षणात एकाच जातीसाठी वेगवेगळे कोड देणे योग्य नाही.’ असे त्यांनी म्हटले.

या पत्रकार परिषदेला भाजप महानगर अध्यक्ष गीता सुतार, ग्रामीण अध्यक्ष सुभाष पाटील, निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले, माजी खासदार मंगला अंगडी, माजी आमदार संजय पाटील, नगरसेवक राजशेखर ढोणी, मुरुगेंद्रगौडा पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *