
बेळगाव : बेळगावचे प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक सुधाकर शानभाग यांचे निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. सुधाकर शानभाग यांचे वार्धक्याने निधन झाले. शानभाग हे बेळगाव कॉलेज रोडवरील सन्मान हॉटेलचे मालक होते. अलिकडेपर्यंत ते हॉटेलचे प्रमुख होते.
दुपारी १ वाजता सदाशिवनगर रुद्रभूमी येथे अंत्यसंस्कार केला जाणार आहे.
सुधाकर शानभाग यांच्या निधनाबद्दल मित्र परिवार आणि नातेवाईकांनी शोक व्यक्त केला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta