बेळगाव : कर्नाटक सरकारच्या वतीने 22 सप्टेंबर पासून 10 ऑक्टोबर दरम्यान जातीय शैक्षणिक सामाजिक जनगणना सुरु करण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षकांना या जनगणतीची जबाबदारी देण्यात आली आहे.
बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर येथेही जनगणती सुरू करण्यात आली. माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांनी गणतीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना सकल मराठा समाजाच्या भूमिकेबद्दल माहिती दिली. आगामी काही दिवसात येळ्ळूर गाव पूर्ण जनगणता करण्यात येणार आहे. येळ्ळूरसह बेळगाव तालुक्यातील प्रत्येक गावात जनगणना सुरू करण्यात आली असून बहुतांश गावांमधून त्या गावच्या प्राथमिक शिक्षकांना गणतीची जबाबदारी देण्यात आली आहे. ग्रामस्थ आणि शिक्षकांचा संपर्क वारंवार येत असतो त्यामुळे समन्वय देखील साधण्यात सुलभता येत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta