Wednesday , March 4 2026
Breaking News

जायंट्स सोशल वेल्फेअर असोसिएशनच्या अध्यक्षपदी शिवकुमार हिरेमठ तर सचिव म्हणून मदन बामणे यांची निवड

Spread the love

 

बेळगाव : जायंट्स सोशल वेल्फेअर असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच कपिलेश्वर रोड येथील जायंट्स भवन येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
यावेळी २०२५-२६ सालासाठी अध्यक्षपदी शिवकुमार हिरेमठ तर सचिव म्हणून मदन बामणे यांची निवड करण्यात आली.
तसेच उपाध्यक्ष म्हणून उमेश पाटील तर खजिनदार म्हणून संजय पाटील यांची निवड झाली आहे.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष शिवराज पाटील होते.
ज्येष्ठ सदस्य मोहन कारेकर तसेच संजय पाटील व्यासपीठावर होते.
या साऱ्यांचे निवडीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *