Monday , December 8 2025
Breaking News

‘बेधडक शक्तीस्वरूप 2025’ उत्कृष्ट देवीमूर्ती स्पर्धेचा निकाल जाहीर

Spread the love

 

बेळगाव (प्रतिनिधी) : बेधडक बेळगाव आयोजित ‘बेधडक शक्तीस्वरूप 2025 उत्कृष्ट देवीमूर्ती स्पर्धा’ मोठ्या उत्साहात पार पडली. विविध मंडळांनी साकारलेल्या कलात्मक व भक्तिभावपूर्ण देवीमूर्तींपैकी सर्वोत्तम मूर्तींना पारितोषिके जाहीर करण्यात आली.

निकाल पुढीलप्रमाणे :

🥇 प्रथम क्रमांक – बेळगावची मानाची आई भवानी, सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ, STM समर्थ नगर, बेळगाव

🥈 द्वितीय क्रमांक – वडगावची आदिशक्ती, नरवीर रासलीला दांडिया ग्रुप, कारभार गल्ली, वडगाव

🥉 तृतीय क्रमांक – शाहूनगरची कुलस्वामिनी, मोरया युवक मंडळ, शाहूनगर

✨ उत्तेजनार्थ – बेळगावची मानाची कुलस्वामिनी, सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ, फुलबाग गल्ली, बेळगाव

🏅 पाचवा क्रमांक विभागून –

बेळगावची कुलस्वामिनी, सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ, मेनसे गल्ली, बेळगाव

विजयनगरची माऊली, छत्रपती श्री शंभूराजे मित्र मंडळ, विजयनगर, बेळगाव

🌟 विशेष पुरस्कार –

बेळगावची आदिशक्ती, सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ, केळकर बाग, बेळगाव

बेळगावची महिषासुरमर्दिनी, नेताजी सुभाष युवक मंडळ, भारत नगर पहिली गल्ली, शहापूर, बेळगाव

या स्पर्धेत सहभागी सर्व मंडळांना विशेष प्रमाणपत्र देण्यात येणार असून विजेत्यांचे पुरस्कार त्यांच्या मंडळात प्रत्यक्ष जाऊन सोहळ्याने प्रदान करण्यात येतील.

बेळगावच्या नवरात्रोत्सवातील ही स्पर्धा शहरातील सांस्कृतिक परंपरा व कलात्मकता जपणारी ठरली असून विजेत्या मंडळांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी नेताजी जाधव यांची निवड

Spread the love  सार्वजनिक वाचनालयाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड बेळगाव : १७७ वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *