Wednesday , March 4 2026
Breaking News

उचगाव ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष, बेळगुंदी ग्रामपंचायतचे माजी उपाध्यक्ष यल्लाप्पा ढेकोळकर यांचे निधन

Spread the love

 

बेळगाव : उचगाव ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष, बेळगुंदी ग्रामपंचायतचे माजी उपाध्यक्ष, बालवीर सेवा मंडळाचे संस्थापक सदस्य, बालवीर अर्बन संस्थेचे संस्थापक चेअरमन, बालवीर विद्यानिकेतनचे संचालक, ढेकोळकर ट्रेडर्सचे मालक, व तालुका पंचायत माजी सदस्य आणि विद्यमान ग्रामपंचायत उपाध्यक्ष गीता ढेकोळकर यांचे पती, ग्रामपंचायत सदस्य कल्लाप्पा ढेकोळकर (KG) यांचे वडील बंधू यल्लाप्पा गावडू ढेकोळकर (YG) वय (वर्षे 53) यांचे शुक्रवार दिनांक 3 रोजी अल्पशा आजाराने उपचारादरम्यान निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, सुना, आई – वडील, दोन भाऊ, भावजय असा परिवार आहे.

अंत्यविधी उद्या शनिवार दिनांक 4 रोजी सकाळी दहा वाजता शिवाजीनगर बेळगुंदी येथील स्मशानभूमीमध्ये होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *