

बेळगाव : शुक्रवारी रात्री बेळगाव शहरातील खडक गल्ली परिसरात दोन गटात धार्मिक वाद उसळून दगडफेकीची घटना घडली होती. शुक्रवारी मेहबूब सुभानी दर्ग्याची उरूस मिरवणुक दरवर्षी शनिवार खुट आणि जालगार गल्ली मार्गे मिरवणूक काढण्यात येते. मात्र यावर्षी परवानगी शिवाय खडक गल्लीत मिरवणूक आल्यामुळे दोन गटात शाब्दिक बाचाबाची झाली त्याचे पर्यावसन दगडफेकीत झाले. याप्रकरणी मार्केट पोलिसांनी एकूण 50 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यापैकी दहा जणांची नावे निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वीच 11 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. उरूस मिरवणुकीचा नेहमीचा मार्ग बदलून खडक गल्लीत प्रवेश केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सदर मिरवणुकीत धार्मिक वाद निर्माण करणाऱ्या घोषणा दिल्यामुळे हा वाद सुरू झाला. स्थानिक हिंदू रहिवाशांनी या घोषणेवर आणि मिरवणुकीचा मार्ग विनापरवाना बदलल्यावर आक्षेप घेतल्याने हा वाद निर्माण झाला होता. मिरवणुकी दरम्यान काही युवकांनी धार्मिक घोषणा देत तलवारी दाखवल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. खडक गल्ली येथील रहिवाशांनी मार्केट पोलीस स्थानकात या घटनेसंदर्भात तक्रार दाखल केली असून एकूण 50 जणांविरुद्ध पुन्हा नोंद केला असून यापैकी दहा जणांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. पोलीस आयुक्त व उपायुक्तांना घटनेची माहिती मिळताच डीसीपी नारायण बरमणी आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली व पुढील तणाव टाळण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढविली आहे. परवानगीशिवाय मिरवणुकीचा मार्ग बदलून शहरातील शांतता भंग करत जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रहिवाशांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta