

बेळगाव : तीन दिवसांपूर्वी बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील कमलादिनी येथे एका पतीने पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह पलंगाखाली लपवून ठेवून आणि मोबाईल फोन बंद करून पळून गेल्याची घटना उघडकीस आली आहे.
साक्षी आकाश कुंभार (२०) असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे. चार महिन्यांपूर्वी आकाशशी लग्न करणाऱ्या साक्षीला हुंडा आणण्यासाठी तिचा पती आकाश सतत छळ करत असल्याचा संशय आहे.
तीन दिवसांपूर्वी तिची हत्या करून आकाश पळून गेला होता. मात्र मुंबईला गेलेल्या त्याच्या सासू घरी परतल्यानंतर सदर प्रकरण उघडकीस आले. ही बाब उघडकीस येताच मुडलगी पोलिस आणि गोकाक डीवायएसपी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला. मुडलगी तहसीलदार श्रीशैल गुडामे यांनी घटनास्थळी भेट दिली. ही घटना मुडलगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
Belgaum Varta Belgaum Varta