

बेळगाव : श्री समादेवी संस्थान, वैश्य वाणी समाज, युवा संघटना, महिला मंडळ यांच्यावतीने शनिवार दिनांक 11/10/2025 रोजी सायंकाळी ठीक 5 वाजता रामनाथ मंगल कार्यालय, भाग्यनगर येथे कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त संस्थेच्या वतीने विविध भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रथम सायंकाळी ठीक 5 वाजता स्वरामृत वर्षा हा सुमधुर गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाची प्रसुती बेळगाव मधील सुप्रसिद्ध गायिका सौ. राजश्री हेबाळकर शास्त्रीय संगीताचे गायक श्री योगेश रामदास आणि उगवती कलाकार तसेच सुर नवा ध्यास नवा या टीव्ही शोमध्ये दुसरा क्रमांक पटकाविलेली कुमारी अंतरा अमित कुलकर्णी आणि इतर सह कलाकार करणार आहेत.
त्यानंतर वैश्यवाणी समाजातील उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सत्कार प्रमुख पाहुणे डॉ. शिवानंद बांदेकर, डीन गोवा वैद्यकीय महाविद्यालय, यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
वैश्यवाणी समाजातील बंधू- भगिनीनी या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे संस्थेतर्फे कळविण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta