

बिजगर्णी… शिक्षण हेच आयुष्य जगायला शिकवते. मातृभाषेतून मिळालेलं ज्ञान जीवन जगण्याची प्रेरणा देते. मराठी प्राथमिक शाळेत उत्तम संस्कार मिळाले. 1951 मध्ये या शाळेत शिकलो. दान करणं हे पुण्य कर्म आहे आपल्या कडील काही इतरांना देऊन आनंद मिळवा.देण्याची वृत्ती ठेवा. शाळेचे उपकार कधी विसरू शकत नाही. शाळा ही आई समान आहे शाळेतील अनुभव भविष्य घडवतात असे भावनिक मनोगत एस.आर. मोरे यांनी इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमात व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सह्याद्री सोसायटीचे चेअरमन पी. पी. बेळगावकर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पी के पाटील यांनी प्रास्ताविक करुन व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत केले.
यावेळी प्राथमिक शाळेतर्फे, तसेच महात्मा गांधी सामाजिक संस्था कावळेवाडी यांच्याकडून सह्याद्री सोसायटीचे चेअरमन व दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या सहसचिव पदी नियुक्ती झाल्याबद्दल पी पी बेळगावकर यांचा विशेष सत्कार सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन एस आर मोरे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर एस आर मोरे,पी पी बेळगावकर, वाय पी नाईक, पी आर गावडे, ह भ प शिवाजी जाधव, पांडुरंग मोरे, सौ लक्ष्मी महेंद्र जाधव, नीता अष्टेकर, आरती विभूती उपस्थित होते.
या प्रसंगी एस आर मोरे यांनी प्राथमिक शाळेतील गरज लक्षात घेऊन कपाट देणगी देण्याचे जाहीर केले. तसेच कावळेवाडी महात्मा गांधी वाचनालयासाठी पंचवीस हजार रुपये चेवाचनीय ग्रंथ उपलब्ध करून देऊ असे जाहीर केले.
यावेळी पी पी बेळगावकर, वाय पी नाईक यांनी मनोगत व्यक्त केले
सूत्रसंचालन पी आर गावडे, प्रास्ताविक पी के पाटील, आभार शिक्षिका तेजस्विनी कांबळे यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta