Wednesday , March 4 2026
Breaking News

सर्वोच्च न्यायालयातील घटनेचा बेळगाव बार असोसिएशनच्या वतीने निषेध

Spread the love

 

बेळगाव : नवी दिल्ली येथे 6 ऑक्टोबर रोजी सरन्यायाधीशांच्या खंडपीठांसमोरील सुनावणी दरम्यान एका वकिलाने सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याची निंदनीय घटना घडली होती. त्या घटनेचा निषेध करत या प्रकरणातील दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बेळगाव बार असोसिएशनतर्फे राष्ट्रपतींकडे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करत गुरुवारी केली आहे.
राष्ट्रपतींच्या नावे असलेल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकानी स्वीकारले असून ते त्वरित राष्ट्रपती कार्यालयाकडे पाठवून देण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.
न्यायालयीन कामकाजादरम्यान भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांवर वकील राकेश किशोर यांनी बूट फेकून हल्ला केल्याची निंदनीय घटना घडली होती. या घटनेचा बेळगाव बार असोसिएशनतर्फे निषेध व्यक्त केला. कायदेशीर बंधुत्वाचा मान आणि प्रतिष्ठा राखण्यासाठी व्यवसाय गैरवर्तनाच्या प्रकरणांमध्ये दोषींवर कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बेळगाव बार असोसिएशन आणि वकिलांची आहे. सर्व वकिलांनी न्यायव्यवस्थे प्रती प्रामाणिकपणा आणि आदराने वागणे आवश्यक आहे. तेव्हा वकील राकेश किशोर यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रपतींच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *