

बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्यामार्फत आयोजित जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत विश्वभारत सेवा समिती संचलित पंडित नेहरू हायस्कूल शहापूर बेळगाव या शाळेतील चार विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक मिळवलेले आहे. 14 वर्षाखालील राजू दोडमनी यांने 48 किलो वजन गटात प्रथम क्रमांक तसेच 17 वर्षाखालील कैलास आर टी याने 65 किलो वजन गटात गिरको रोमण या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक, विनय मुतनाळ यांने 71 किलो वजन गटात गिरको रोमण यामध्ये प्रथम क्रमांक, सुरेश लंगोटी 92 किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. या विद्यार्थ्यांना विश्वभारत सेवा समितीचे अध्यक्ष श्री. विजयराव नंदिहळी तसेच शाळेचे मुख्याध्यापक मारुती मुगळी, क्रीडाशिक्षक निरंजन कर्लेकर व विज्ञान शिक्षक विनायक कंग्राळकर तसेच शाळेचे सर्व शिक्षक वर्ग व कर्मचारी वर्ग यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे. आता या विद्यार्थ्यांची निवड बेंगळूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी झालेली आहे.

Belgaum Varta Belgaum Varta