Wednesday , December 10 2025
Breaking News

कावळेवाडीत भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम जयंती उत्साहात साजरी

Spread the love

 

 

कावळेवाडी… येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था व वाचनालय तर्फे थोर वैज्ञानिक राष्ट्रपती भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर.बी. देसाई उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. डॉ.कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन बिजगर्णी ग्रामपंचायत माजी अध्यक्ष मनोहर बेळगावकर यांच्या हस्ते झाले. यावेळी उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.
प्रास्ताविक वाय पी नाईक यांनी करताना आजच्या दिवसाचे विशेष महत्त्व विशद केले. या जयंती निमित्त विश्व विद्यार्थी दिन,वाचन प्रेरणा दिवस, वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून सर्वत्र विविध उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही गावात, परिसरातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी डॉ. कलाम यांच्या जीवनाचा अभ्यास व्हावा त्यासाठी विचार व्यक्त करण्यासाठी भाषणकरण्याची संधी दिली. विद्यार्थी हाच देशाचा शिल्पकार आहे.ते भविष्यात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी कृतीशील बनावेत.हाच उद्देश ठेवून नियोजन केले. उत्तम प्रतिसाद मिळाला असे विचार व्यक्त करुन श्री. नाईक यांनी समाधान व्यक्त केले
यावेळी विशेष सन्मान वृत्तपत्रे वितरण करणारे राजा भोसले यांचा शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन मनोहर बेळगावकर, पुंडलिक जाधव यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.सातत्याने भोसले हे ४२ वर्षे पाऊस, ऊन थंडीचा विचार न करता घरोघरी पेपर वितरण करतात हे आदर्शवत कार्य उल्लेखनीय आहे.याचा सार्थ अभिमान संस्थेला वाटतो. त्यांच्या कष्ट परिश्रम मेहनतीचा गौरव आहे. एक प्रातिनिधिक स्वरूपात हा सन्मान केला असे अनेक बांधव कार्यरत आहेत त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा अशा शब्दांत मनोहर बेळगावकर यांनी मनोगत व्यक्त केले

अध्यक्षीय भाषणात आर. बी. देसाई यांनी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी असे उपक्रम गरजेचे आहेत. वाचनातून जीवन समृद्ध होते. वृतपत्रे, पुस्तके वाचा ज्ञानाची कास धरली पाहिजे. खेडे गावात महात्मा गांधी संस्था कार्यरत आहे. पश्चिम भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जाते हे भूषणावह आहे, असे मौलिक विचार व्यक्त केले.
व्यासपीठावर मनोहर बेळगावकर, पुंडलिक जाधव, आर बी देसाई, सौ.पूजा गोडसे, वनश्री पाटील, प्राजक्ता गावडा, जोतिबा मोरे, शिवाजी जाधव, अश्विनी झंगरुचे, यशवंतराव मोरे, विशाल भास्कर, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पंचवीस विद्यार्थ्यांना पुस्तक, पेन, गौरव पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. दर्शना जाधव (कर्ले), गौरी स. जाधव, (बिजगर्णी), सान्वी झंगरुचे (बालवीर बेळगुंदी), श्रावणी गावडे (कावळेवाडी), स्वरा पाटील (सोनोली), अन्वी वि.भाष्कळ, वैभवी य. गावडे, सानिका चौगुले, अरव गावडा, दिया गोडसे, पूर्वी कंग्राळकर, गायत्री बा मोरे, श्रृती शं. गावडे आदी उपस्थित विद्यार्थी सहभागी झाले होते. या निमित्ताने डॉ. कलाम यांच्या जीवनकार्याची ओळख झाली.

राजा भोसले यांनी, सर्वांच्या सदिच्छा पाठिशी असल्यामुळे हे कार्य मी न थकता अविरत चालू ठेवले आहे. तुमच्या शुभेच्छा हीच माझी ऊर्जा आहे हा माझा सन्मान वैयक्तिक नसून सर्व वृत्तपत्रांचा आहे, असे भावनिक मनोगत व्यक्त केले.

यावेळी विविध गावचे पालक उमेश सागावकर, विजयकुमार देवाण (तुडये), सौ.रेखा स. मोरे, एम.पी.-मोरे, लक्ष्मण जाधव, पी एस.मोरे, शशिकांत गावडे, उत्तम बाचीकर, यल्लापा गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन किशोर पाटील यांनी केले. आभार श्री. कोमल गावडे (शिक्षक) यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

देशाला देशभक्त, शिस्तबद्ध व कर्तव्यनिष्ठ तरुणांचीच गरज : नायब सुभेदार सुभाष भट्ट

Spread the love  शिवानंद महाविद्यालयातील ३० हून अधिक एनसीसी विद्यार्थी सैन्यात भरतीनिमित्त सत्कार कागवाड : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *