

बेळगाव (प्रतिनिधी) : रविवारी झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथ संचलनात भाग घेतल्याबद्दल कॅम्प मधील एका नामवंत हायस्कूलमध्ये पाचवी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला वर्गाबाहेर उभा करून शिक्षा दिलेल्या “त्या” शिक्षिकेने आज झाल्याप्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करून भविष्यात अशी चूक पुन्हा करणार नसल्याचे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.
सदर प्रकरण भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी पाठपुरावा पाठपुरावा करून हाताळला आहे.
त्या शिक्षिकेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मी कोणतीही अवमानकारक टिप्पणी केलेली नाही. कोणत्याही विद्यार्थी किंवा समाज संस्था किंवा मुलाच्या भावना दुखावण्याचा किंवा त्याला इजा पोहोचवण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. जर माझ्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मला त्याबद्दल अत्यंत खेद आहे आणि मी त्याबद्दल माफी मागते. अशा प्रकारची गोष्ट भविष्यात पुन्हा होणार नाही याची मी खात्री देते.
या निवेदनामुळे सध्या झाल्या प्रकारावर पडदा पडला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta