

बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या प्राथमिक विभागाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांना प्रारंभ झाला.
स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेचे माजी राष्ट्रीय महिला फुटबॉल खेळाडू सान्वी पाटील, चैत्रा इमोजी, शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, गीता भाग्गाणाचे, आशा कुलकर्णी, क्रीडाशिक्षक चंद्रकांत पाटील, शिवकुमार सुतार, अनुराधा पुरी, उपस्थित होते. प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते क्रीडाध्वजारोहण व ओमकार सरस्वती भारत माता फोटो पूजन व दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर खेळाडू अर्णव हलगेकर, अब्दुल मुल्ला, इस्माईल मुजावर, अनवी बडमंजी, सुशांत बजंत्री, सान्वी बडमंजी, प्रियांका बिर्जे, स्वराली बडमंजी, कादंबरी शिंदे. या खेळाडूंनी मैदानाभोवती क्रीडाज्योत फिरवून पाहुण्यांच्याकडे सुपूर्द केली खेळाडू कादंबरी शिंदे हिने सहभागी खेळाडूंना शपथ दिली. यानंतर उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंना शालेय जीवनातील क्रीडा स्पर्धाचे महत्व याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदवी शिंदे तर सान्वी कुलकर्णी यांनी आभार मानले. याप्रसंगी शिक्षिका सरोजा कटगेरी, विणा जोशी, पद्मिनी कुलकर्णी, तेजस्वी पाटील, बसवंत पाटील सुनीता पाटील, यश पाटील व इतर शिक्षक वर्ग उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta