

बेळगाव : गुरुवर्य वि.गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे रविवार दिनांक 26 ऑक्टोबर रोजी मराठी व्याकरण स्पर्धा परीक्षा व द. रा. किल्लेकर स्मृती हस्ताक्षर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा मराठी विद्यानिकेतन येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेचे उद्घाटन दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सदस्य व मच्छे हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. समरसेन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रबोधिनीचे अध्यक्ष श्री.जयंत नार्वेकर, उपाध्यक्ष श्री. चंद्रकांत पाटील, सचिव श्री.सुभाष ओऊळकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक श्री. एन. सी. उडकेकर यांनी केले यानंतर समरसेन पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. आठवी व दहावीच्या व्याकरण परीक्षेमध्ये भाग एकूण ३५५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. व त्याचबरोबर हस्ताक्षर स्पर्धेसाठी 200 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

स्पर्धकांच्या उस्फूर्त प्रतिसादामुळे ही स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. लवकरच या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येत आहे व या सर्व यशस्वी स्पर्धकांना 15 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या रौप्यमहोत्सवी मराठी बाल साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रबोधिनीचे सदस्य सुरेश गडकरी, बसवंत शहापूरकर, इंद्रजीत मोरे, धीरज सिंह राजपूत, गजानन सावंत, प्रसाद सावंत, हर्षदा स्नेहल पोटे यांनी परिश्रम घेतले. स्पर्धा परीक्षक म्हणून बी एम पाटील, महेश हगिदळे, श्रीधर बेन्नाळकर, दत्ता पाटील, सहदेव कांबळे, विशाल पाटील, विशाल जाधव, शांताराम पाटील यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन व आभार हर्षदा सुंठणकर यांनी व्यक्त केले.
——————————————————————-
दिनांक 29 व 30 रोजी होणारी मानवतावादी लक्ष्मणराव ओऊळकर व्याख्यानमाला पाऊस व वातावरणातील बदलामुळे स्थगित करण्यात आली असून व्याख्यानमालेच्या पुढील तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील. कृपया याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे प्रबोधिनीतर्फे कळविण्यात आले आहे..
Belgaum Varta Belgaum Varta