Wednesday , March 4 2026
Breaking News

“शौर्यवीर रन २०२५” स्पर्धेत बेळगावात धावले शेकडो धावपटू!

Spread the love

 

बेळगाव : मराठा लाईट इन्फट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे रविवारी “शौर्यवीर रन २०२५”चे आयोजन करण्यात आले होते. ७९ व्या इन्फंट्री डे निमित्त शौर्यवीर रनचा प्रारंभ शिवाजी स्टेडियम येथून झाला. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडीयर जॉयदीप मुखर्जी यांनी ध्वज दाखवून रनचा प्रारंभ केला. तीन विभागात घेतल्या गेलेल्या या स्पर्धेमध्ये बेळगाव आणि बाहेरील राज्यातून आलेल्या शेकडो धावपटुनी सहभाग नोंदवला होता. पाच कि मी., ७ कि.मी. आणि २१ कि.मी. अशा तीन विभागात झालेल्या रन मध्ये विद्यार्थी, तरुण तरुणी, माजी सैनिक सहभागी झाले होते. धावण्याच्या मार्गांवर ठराविक अंतरावर पाणी तसेच वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्यात आली होती. विजेत्यांना रोख रक्कम, मेडल आणि प्रमाणपत्र शिवाजी स्टेडियम येथे ब्रिगेडीयर जॉयदीप मुखर्जी यांच्या हस्ते देण्यात आले. शौर्यवीर रन स्पर्धेला बेळगाव आणि बाहेरील धावपटुनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. देशाचे रक्षण करताना बलिदान दिलेल्या सैनिकांच्या गौरवार्थ दरवर्षी २७ ऑक्टोबर या दिवशी इन्फंट्री डे चे आयोजन केले जाते. सगळ्यांनी दैनंदिन जीवनात तंदुरुस्त राहण्यासाठी धावणे आवश्यक आहे, असे ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी विजेत्या धावपटूंना बक्षीस देताना उद्गार काढले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *