Saturday , March 7 2026
Breaking News

लाच मागितल्याप्रकरणी अभियंता लोकायुक्तांच्या जाळ्यात

Spread the love

 

बेळगाव : पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीचा भरपाईचा धनादेश देण्यासाठी १ लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी शहर पाणीपुरवठा आणि सांडपाणी महामंडळाचे कार्यकारी अभियंता यांना लोकायुक्तांनी ताब्यात घेतले.

रायबाग तालुक्यातील खेमलापूर गावातील यासिन पेंधारी यांच्या १४ गुंठे जमिनीचे मुगळखोड आणि हारुगेरी शहरांसाठी ‘अमृत’ योजनेअंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा योजनेसाठी जमीन संपादित करण्यात आली होते. या संपादित जमिनीबाबत शासनाकडून मंजूर झालेल्या १८ लाख रुपयांच्या अनुदानाचा चेक मंजूर करून देण्यासाठी १ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप बेळगाव विभागातील नगर पाणीपुरवठा सांडपाणी मंडळाचे कार्यकारी अभियंता अशोक शिरूर यांच्यावर करण्यात आला आहे.

७-१०-२०२५ रोजी कर्नाटक लोकायुक्त स्टेशन, बेळगाव येथे भ्रष्टाचार कायद्याच्या कलम ७(अ) अंतर्गत पीआय निरंजन पाटील यांनी कर्नाटक लोकायुक्त स्टेशन येथे तक्रार दाखल केली आणि श्री. हणमंथराय एसपी, बेळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी चौकशी केली.

हनमंतराय, पोलिस अधीक्षक, लोकायुक्त, बेळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी २७-१०-२०२५ रोजी तपास अधिकारी निरंजन पाटील व त्यांच्या पथकाने आरोपी अधिकारी अशोक शिरूर (कार्यकारी अभियंता, नगर पाणीपुरवठा सांडपाणी विभाग) यांना त्यांच्या कार्यालयात अटक केली.

श्री. गोविंदगौडा पाटील पीआय आणि कर्मचारी रवी मावरकर, गिरीश, शशिधर, सुरेश आणि मल्लिकार्जुन ठैकर यांनीही या तपासादरम्यान सहाय्यक म्हणून काम केले.

About Belgaum Varta

Check Also

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला ३० वर्षांची सक्तमजुरी

Spread the love  बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा पोक्सो न्यायालयाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *