

बेळगाव : बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो.चे निवड झालेले स्केटर्स 41 व्या राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत सहभागी झाले होते या स्पर्धेमध्ये 200 च्यावर कर्नाटक राज्यातील टॉप स्केटिंगपटू सहभाग घेतला होता. या स्पर्धा तुमकुर व बेंगलोर येथे पार पडल्या.या स्पर्धेत बेळगांवच्या स्केटर्सनी चमकदार कामगिरी करत 13 सुवर्ण,8 रौप्य व 3 कांस्य अशी एकूण 26 पदके जिंकली
पदक विजेते स्केटर्स खालील प्रमाणे
देवेन बामणे 1 सुवर्ण, साईराज मेंडके 2 सुवर्ण, हिरेन राज 1 सुवर्ण, 1 रौप्य, दृष्टी अंकले 1 सुवर्ण, 1रौप्य, अवनीश कोरिशेट्टी 1सुवर्ण, 1 रौप्य, मनन अंबीगा 1 सुवर्ण, जयध्यान राज 2 रौप्य, रश्मीता अंबीगा 2 रौप्य, अभिषेक नावले 1 रौप्य, खुशी आगशिमनी 2 रौप्य, अथर्व हडपद 1 कांस्य, अन्वी सोनार 1 सुवर्ण, शेफाली शंकरगौडा 1 सुवर्ण, खुशी घोटीवरेकर 1 सुवर्ण, सई शिंदे 1 सुवर्ण, मुद्दलसिका मुलाणी 1 सुवर्ण आहद मुलाणि 1 सुवर्ण
वरील सर्व स्केटर्स के एल ई सोसायटी स्केटिंग रिंक व गुड शेफर्ड स्केटिंग रिंक वर प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, मंजुनाथ मंडोलकर, विठ्ठल गंगणे, योगेश कुलकर्णी, यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असून या सर्वांना डॉ. प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडुलकर, कर्नाटका रोलर स्केटिंग असो.चे जनरल सेक्रेटरी इंदुधर सीताराम याचे प्रोत्साहन मिळत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta